राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात येणारी नीट-2026 परीक्षा आज अकोला जिल्ह्यातील 18 केंद्रांवर पार पडणार आहे. अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर येथे परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.