देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता बीड कनेक्शन समोर आलं आहे. सीबीआयने लातूरमधून अटक केलेले निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे मूळचे बीडचे असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नीटच्या पेपर सेटिंग समितीत भूमिका असलेल्या कुलकर्णींवर संशयाची सुई फिरत असतानाच बीडच्या शाहूनगर परिसरातील त्यांच्या वडिलोपार्जित घराचीही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हे जुनं घर नुकतंच पाडण्यात आलं असून सध्या त्याठिकाणी नूतनीकरणाचं काम सुरू आहे.