अकोला :नीट पेपरफुटी प्रकरणी आज सीबीआयने RCC कोचिंग क्लासचे संचालक मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलन केले. अकोला शहरातील RCC मोटेगावकर कोचिंग क्लाससमोर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत क्लासच्या बोर्डाला काळे फासले तसेच बॅनर फाडले आहे. यावेळी मनसेने जिल्ह्यात तसेच शहरात बाहेरील शिकवणी वर्ग आणि करिअर गाईडन्स क्लासेस सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. या प्रकरणाची सीबीआयने सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी मनसेने केली.