नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याचे बीडमध्ये वडिलोपार्जित घर असून या ठिकाणी तो आता टोलेजंग इमारत उभारत आहे. या इमारत बांधकामाच्या संदर्भात कोणतेही निकष पाळले गेले नसल्याचे आता समोर आले असून नगरपालिकेने या इमारतीची मोजणी करत नोटीस देखील बजावली आहे.