लातूर : नीट परीक्षेत मोठ यश मिळाल्या नंतर लातूर मध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आहे. लातूरच्या क्लासेस एरियात आज विद्यार्थ्यांनी एकत्र येत जल्लोष केला आहे. लातूर मधून 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. शैक्षणिक संस्था आणि खासगी कोचिंग क्लासेसचा हा एकत्रित निकाल आहे.