समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक चालकांच्या बेजबाबदारपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्ध्याजवळ तीन ट्रक चालकांनी चक्क एकमेकांमध्ये रेस लावल्याचे दिसून आले. एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक चालकांनी महामार्गावरील इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी पुरेशी जागा न दिल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.