नवी मुंबईतील नेरूळ येथील श्री शिवछत्रपती स्मारकाच्या अनावरणावरून वाद निर्माण झाला आहे. सहा महिने बंदिस्त असलेले हे स्मारक अमित ठाकरे यांनी उघडल्यानंतर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गजानन काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकारचे हे स्वराज्य आहे का, असा सवाल करत शिवप्रेमींना पेटून उठण्याचे आवाहन केले आहे.