मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचा पदग्रहण सोहळा आज स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि पालिका आयुक्त राधाबीनोद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. पदभार स्वीकारताच नवनिर्वाचित महापौरांनी शहराच्या विकासाचा अजेंडा स्पष्ट केला आहे. "मीरा-भाईंदरमधील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा पुरवणे आणि सर्वसामान्यांना न्याय देणे हेच आमचे प्रथम ध्येय असेल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.