बदलापूर पूर्व परिसरात गेल्याच महिन्यात उद्घाटन करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बदलापूर पूर्वेकडील शिरगांव परिसरात वाढीव बदलापूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ही टाकी बांधण्यात आली होती.