निसर्गरम्य कोकण पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतं. त्यामुळं कोकणात मान्सून दाखल झाला कि कोकणातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले धबधबे प्रवाहित होतात. पहिल्याच पावसामध्ये सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील न्हावनकोंड धबधबा प्रवाहित झालेला पाहायला मिळतो.