निफाड : श्री मतोबा महाराज यांच्या चांदीच्या तीन किलोच्या दोन मुर्त्या व दानपेटीतील रोख रक्कम चोरी प्रकरणी नैताळे येथील ग्रामस्थ आणि श्री मतोबा महाराज भाविकांनी आक्रमकपणे रस्ता रोको केला.सात दिवस उलटून अद्यापही चोरीचा तपास न लागल्याने ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये पोलिसांच्या कामकाज विरोधात संतापाची लाट उसळली आहे.