अकोला जिल्ह्यातल्या पातुर तालुक्यातील निर्गुणा नदीला पूर आला आहे. तर पातुर तालुक्यातील आलेगाव येथील निर्गूना नदीवरील पुलावरून जवळपास 4 ते 5 फूट पुराचे पाणी वाहत आहे, त्यामुळे 30 ते 40 गावांचा संपर्क तुटला आहे. निर्गुणा नदीच्या पुलावर असलेले पुलाचे संरक्षण कठडे ही या पुरात वाहून गेले आहेत.