लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेमुळे अनेक राज्य कर्जात गेल्याचे अहवालातून समोर आले आहे, ज्यामुळे महसुली तूट वाढत असल्याची चिंता व्यक्त झाली. तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत असल्याचाही उल्लेख अहवालात आहे.