ठाकरे गटाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बाजार उठलेला आहे. त्यामुळे जवळचे शिवसैनिक महायुतीत म्हणजेच भाजप आणि प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटात जात आहेत त्यामुळे ही मोहीम शिवसेनेसाठी नसून त्यांच्या आदू बाळासाठी आहे. याबाबत उद्धव ठाकरे स्पष्ट करावं आणि नौटंकी बंद करावी, असे म्हणत भाजपच्या नितेश राणेंनी टीका केली आहे.