मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदेंची युती 130 जागांवर आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधूंची युती 72 जागांवर आघाडीवर आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विटरवर एक उपरोधिक हसण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिला आहे.