केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. फुकटच्या गोष्टी टाळून कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. पाच हजार जणांनी तिकीट मागितल्याने स्थिती आव्हानात्मक असून, जनमताचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देणार असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.