केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरमध्ये आपल्या नव्या वाड्याचा पुनर्विकास केला आहे. हा वाडा पूर्णपणे पर्यावरणपूरक असून, त्याला प्लॅटिनम रेटिंग ग्रीन हाऊसचा दर्जा मिळाला आहे. उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थंड आणि हिवाळ्यात उबदार राहणाऱ्या या वास्तूत केरळ व कोकण शैलीतील पारंपरिक कलाकृतींचा वापर करण्यात आला आहे. गडकरींचा हा वाडा आता शाश्वत बांधकामाचे आदर्श उदाहरण बनला आहे.