केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर नागपूरमध्ये क्रीडा सुविधांसाठी क्लब हाऊस उभारले जाईल अशी घोषणा केली आहे. हा प्रकल्प सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गडकरींनी पोलीस लाईन टाकळी ते काटोल रोडवरील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयात तत्कालीन आमदारांच्या दबावामुळे हस्तक्षेप केल्याची कबुली दिली.