वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी, हिरंगी, खेर्डा बु. आणि खेर्डा खुर्द येथील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मागील चार महिन्यांपासून राष्ट्रीय कृषी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग मस्टरचा लाभ मिळालेला नाही.कृषी सहाय्यकांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी विविध योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोप होत असून,वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.