सध्या राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी कट्ट्यावर, चहा टपरीवर, हॉटेलात राजकीय चर्चा झडतांना दिसत आहेत, यातूनच अनेक ठिकाणी वादही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यामुळेच अकोल्यातील सिव्हील लाईन चौकातल्या सर्वाधिक गर्दीचं ठिकाण असलेल्या मधु चहावाल्याने आपल्या टपरीवर लावलेलं सुचनेचं बोर्ड सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. येथे चहा घेतांना कोणतीही राजकीय चर्चा आणि वाद न घालण्याची सुचना त्यांनी ग्राहकांना फरकाच्या माध्यमातून केली आहे.