धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. गेल्या महिनाभरापासून केवळ रिमझिम पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ आली आहे.