विशेषतः गोडाऊनची व्यवस्था नसल्यामुळे उघड्यावर धान साठवले जात आहे. जिल्ह्यातील अनेक आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांवर धान्य साठवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान थेट मोकळ्या जागेतच ठेवले जाते. अनेक दिवस हे धान्य उघड्यावरच पडून राहते.