नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाच प्रमुख दावेदारांची नावे समोर आली आहेत. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप फ्रान्सिस, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांचा समावेश आहे. शांतता प्रस्थापित करणे, मानवाधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे यासारख्या कार्यांसाठी त्यांना नामांकित करण्यात आले आहे.