गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले. अहिंसा सद्भावना यात्रेतून सत्य, अहिंसा, शांतता आणि एकतेचा संदेश दिला. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित यात्रेमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग होता. खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.