अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट" खेळला गेला. धारणी तालुक्यातील दहेंडा गावात यात्रेनिमित्त बोकड पटाची अनोखी स्पर्धा रंगली. खाऱ्या टेंभ्रूच्या गावात लहान छकड्यांना बोकडांना जुंपून ही चुरशीची स्पर्धा पार पडली.बैलगाडा शर्यतीला पर्याय म्हणून झालेल्या मेळघाटातील या आगळ्या वेगळ्या ‘बोकडपट’ स्पर्धेची चर्चा जिल्हाभरात सुरु आहे.