नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीचं विद्यार्थ्यांच्या आवश्यक असलेल्या शालेय साहित्याच्या किमतीत यंदा 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वह्या, पुस्तके, पेन , पेन्सिल, रंगसाहित्य तसेच इतर स्टेशनरी वस्तूंच्या वाढलेल्या दरांमुळे पालकांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्यांना आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे.