अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या मनारखेड गावात एक आज अजब आणि धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. या गावात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापणा झाली. मात्र त्यानंतर जे झाले त्याने गाव चकीत झाले. अकोला जिल्हातल्या मनारखेड गावात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यात चक्क मंदिराच्या कळसावरून नोटांची उधळण झाली. या नोटा वेचण्यासाठी भाविकांची अक्षरश:झुंबड उडाली !