शिर्डीत साईचरणी पुन्हा एकदा सुवर्णदानाची नोंद झाली. नवसपूर्ती झाल्यानंतर बीड येथील साईभक्त धनराज रावसाहेब मुंडे यांनी साईबाबांच्या चरणी आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्णहार अर्पण केला. सुमारे 59 ग्रॅम वजनाचा हा सोन्याचा हार असून त्याची अंदाजे किंमत 8 लाख 42 हजार रुपये इतकी आहे.