सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग या गोवा राज्याच्या सीमेवरील भागात मागील वर्षभर वास्तव्यास असलेला ओंकार टस्कर हत्ती सध्या दोडामार्ग तालुक्यातील कुंबरल परिसरात नागरी वस्त्यांमध्ये फिरताना दिसून येत आहे. ओंकार हत्ती दोडामार्ग आणि गोव्यातील भागात संचार करत असून इथल्या बागायती शेतीचं मोठं नुकसान करत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.