भाऊबीजेच्या दिवशी बहिणींना साडी, मिठाई किंवा दागिन्यांची भेट दिली जाते; मात्र भाजप आमदार श्याम खोडे यांनी शेलू बाजार येथील ३५ महिलांना थेट त्यांच्या हक्काच्या जागेची भेट दिली आहे. अनेक वर्षांपासून अतिक्रमित जागेवर वास्तव्यास असलेल्या ३५ कुटुंबांचे जागेचे पट्टे कायम करून महिलांच्या नावाने ८-अ उतारे वितरित करण्यात आले.