छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्ताने भुसावळ रेल्वे स्थानका जवळील पूर्णाकृती पुतळ्याची रंगरंगोटी करुन सजावट करण्यात आली आहे. पुतळा परिसरात फुलांच्या माळा तसेच समोरील रस्त्यावर विद्युत रोषणाई लावण्याचे काम सुरू होते.