दिवाळीचा उत्साह अन् धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त! रायगडच्या माणगाव बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. मिठाई, फटाके, गिफ्ट हॅम्पर, मातीच्या पणत्या, आकाशकंदील आणि विद्युत रोषणाईच्या साहित्याला ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. दिवाळीच्या आनंदात माणगावची बाजारपेठ अक्षरशः गजबजून गेली आहे.