संभाजी ब्रिगेडतर्फे इयर एंड आणि नवीन वर्षानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला. बार्शीतील वैरागमध्ये 31 डिसेंबरला दारू नको, दूध प्या असा संदेश देण्यात आला. वैराग येथे संभाजी ब्रिगेडतर्फे 1 हजार लिटर दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. वैराग पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या हस्ते हे दुधाचे वाटप करण्यात आले.