धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यात असलेल्या निमगुळ येथे होळीच्या सणाच्या पूर्व संध्येला दुर्गुणाची होळी करून महिलांनी दिला व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश दिला आहे. निमगुळ येथील महिलांनी होळीच्या पूर्वसंध्येला आजूबाजूचा परिसर साफ करून दुर्गुणाची होळी केली. सहसा मोठ्या प्रमाणात पुरुष दारू, गुटखा, तंबाखू, गांजा, बिडी, सिगारेट, मानवी हिंसा, लैंगिक अत्याचार, चंगळवाद आधी करत असतात. परंतु त्याचे दुष्परिणाम महिलांना जास्त भोगावे लागत असतात, त्यामुळे घरात कलह, आत्महत्या, कर्जबाजारीपणा, लैंगिक अत्याचार, संशय वृत्ती असे दुष्परिणाम होतात. त्यामुळे अशा व्यसनापासून पुरुषांनी अलिप्त रहावे, कुणीही असे व्यसन करू नये, व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा असा संदेश या महिलांनी होळीच्या पूर्व संध्येला देण्याचा प्रयत्न केला.