बुद्ध पौर्णिमा निमित्ताने धुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अमृतसागर यांनी झाडांच्या मुळापासून बुद्धांची कलाकृती तयार केली. बुद्ध पौर्णिमा निमित्ताने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अमृतसागर यांनी झाडांच्या मुळापासून बुद्धांची कलाकृती तयार केली आहे. नैसर्गिक घटकांचा वापर करून शिल्प निर्मितीचा छंद जोपासत झाडांच्या मुळांपासून अनेक शिल्प अमृतसागर यांनी तयार केले आहेत. बुद्ध पौर्णिमा निमित्ताने या झाडांच्या मुळांपासून तयार करण्यात आलेल्या शिल्पकलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.