आज संपूर्ण जगभरात गुड फ्रायडेनिमित्त प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्मरण केले जात आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी आणि जगाला क्षमा व शांतीचा संदेश देण्यासाठी येशूने वधस्तंभावर आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच बलिदानाची आठवण म्हणून आज धुळे शहरातील विविध चर्चच्या वतीने 'प्रायश्चित्त फेरी' काढण्यात आली.