महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात भक्ती आणि उत्साहाचा माहोल पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवातील पाचव्या माळेच्या संध्येला तुळजाभवानी मातेचा राजहंस वाहनावरून छबिना काढण्यात आला.