मराठा आरक्षणासाठी मुंबईत ठिय्या मांडून बसलेल्या मराठा बांधवांचे अन्नपाण्यावाचून हाल होऊ नयेत यासाठी थेट कळंबहून मुंबईला खाद्यसामग्री रसद पुरवली जात आहे. घरोघरी थापलेल्या भाकरी, कांदा चटणी, बिस्कीटे, औषधी इत्यादी साहित्य घेवून तीन मालवाहू वाहने मुंबईकडे रवाना झाली आहे. मुंबईतील आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बांधव दाखल झाले असून त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होत असल्याने कळंब शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने मदतीसाठी हात सरसावले. एक घर दोन भाकरी असा सोशल मिडीयावर मॅसेज फिरला अन् नागरिकांनी भरभरून साथ देत तीन वाहने मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे.