मागील काही दिवसांपासून कांद्याने शेतकऱ्यांना रडवलंय, मात्र सोमवारी कांद्याचे दर काहीसे वाढलेत. अहिल्यानगरच्या नेप्ती कांदा बाजारात एका लिलावासाठी 70 हजार कांदा गोण्यांची आवक होती. नगर जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील शेतकरी या बाजारात कांदा विक्रीसाठी आणतात.