बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षी बियाण्याच्या कांद्याची लागवड केल्या जाते. यावर्षी सुद्धा बियाण्याचा कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून आता कांदा बियाणे काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र यावर्षी बियाण्यात मोठी घट झाली आहे.. कारण यावर्षी बियाण्याच्या कांद्यावर मधमाशी नसल्याने बियाणे भरलेच नाही.. त्यमुळे मोठी घट निर्माण झाली असून महिनाभरापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळेसुद्धा अनेक भागात बियाण्याच्या कांद्याचे नुकसान झाले.