धुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. मात्र विहिरीतील उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. सध्या कांद्याला चार हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक भाव मिळत असल्याने, उत्पादन बाजारात येईपर्यंतही असाच चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.