इराण, अमेरिका आणि इस्राएल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा फटका मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातून आखाती देशात होणाऱ्या कांद्यासह इतर शेतमाल निर्यातीला बसला आहे. Unified Agencies India Private Limited कंपनीने दिलेल्या सूचनेनुसार बदलत्या सुरक्षा परिस्थितीमुळे होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावरील जहाज वाहतूक आणि दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील उड्डाणे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. यामुळे समुद्र व हवाई मार्गाने कांदा व भाजीपाला निर्यात ठप्प झाली असून, आधीच घसरलेल्या भावात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.