नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक घटूनही अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. स्वतंत्र कांदा बाजार सुरू होऊनही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाहीये. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून पुढील हंगामात कांदा लागवडीबाबत संभ्रमात आहेत. शासनाने तातडीने यावर लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे.