धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव गडगडले आहेत. कांद्याला अवघा एक हजार रुपये क्विंटल भाव दिला जातो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कांदा पेरणी करून बाजारपेठेत आने पर्यंत त्याला किमान एका एकरला 40 ते 50 हजार रुपये लागत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त एक हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी केला जात आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यावर अन्याय असून किमान दोन हजार रुपयापर्यंत कांदा खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.