लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पंधरा दिवसात कांदा दरात 1 हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अंदाजे 175 ते 200 कोटींचे नुकसान झाले आहे. सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात आहे.