नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले असून, कांद्याच्या बाजारभावात पुन्हा वाढ झाली आहे पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याला तब्बल ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल, तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी दर मिळाला असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे