मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. आता वातावरण बदलाचा परिणाम कांदा पिकावर होताना दिसून येत आहे. तीव्र उन आणि मधेच ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा धोका वाढला आहे. करपा रोगामुळे पानांवर पांढरे चट्टे येत आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..