छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला प्रतिकिलो अवघा सव्वा रुपया भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सायंकाळी बाजार समितीच्या गेटसमोरच कांदा रस्त्यावर फेकून देत 'रास्ता रोको' आंदोलन केले.