जळगावच्या चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या नव्या हंगामातील पहिल्याच लिलावात ३७२५ रुपये प्रतिक्विंटल असा कमाल भाव मिळाला. गेल्या दीड वर्षातील हा सर्वोच्च दर असून, कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.