कोकणातल्या ओंकार हत्तीने चक्क रिसॉर्टमध्येच प्रवेश केल्याची घटना समोर आली आहे.सावंतवाडीच्या सोनुर्ली येथील एका रिसॉर्टमध्ये ओंकार हत्ती दाखल झाला. गेल्या दोन दिवसांपासून सोनुर्ली गावात वास्तव्यास असलेला ओंकार, श्रीदेवी माऊली मंदिर परिसरातून थेट रिसॉर्टमध्ये पोहोचला.